कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेस मध्यरात्रीपासून सुरुवात…

कोल्हापूर – जिल्ह्यात ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेला बुधवारी मध्यरात्री उत्साहात सुरुवात झाली. या भरतीचे उद्घाटन मध्यरात्री जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल प्रशांत सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, लेफ्टनंट कर्नल डॉ. संबित पात्रा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन चवदार, तहसीलदार स्वप्निल पवार, सहाय्यक संचालक आर्मी भरती कार्यालय सुभेदार मेजर लखविंदर सिंग आदी उपस्थित होते.

ही भरती प्रक्रिया आगामी १७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी प्रशासनाकडून सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांसाठी भरती मैदान उत्तम स्थितीत तयार करण्यात आले असून, उमेदवारांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष वैद्यकीय (मेडिकल) टीम तैनात करण्यात आली आहे. विविध एनजीओ (NGOs) च्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी अल्पोपहार (नाश्ता) आणि जेवणाची योग्य सोय करण्यात आली आहे. दूरवरून येणाऱ्या उमेदवारांना रेल्वे स्टेशन व बस स्थानकावरून भरती स्थळापर्यंत येण्या-जाण्यासाठी ‘केएमटी’ (KMT) मार्फत विशेष बससेवेची उपलब्धता करून देण्यात आल्याची, माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.

Scroll to Top