मनोज जरांगेंची मोठी घोषणा…

मुंबईमधील बेमुदत उपोषणाची जाहीर केली रूपरेषा

जालना – गेल्या १५ दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण करत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी राज्य सरकारला आजपर्यंतची वेळ दिली होती ती मुदत आज संपल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याची मोठी घोषणा केली आहे. मुंबईकडे रवाना होण्याबाबतची रूपरेषा त्यांनी जाहीर केली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हटले आहे कि, “आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जायचे आहे. १५ सप्टेंबरला मुंबईसाठी अंतरवाली येथून निघणार आहे. रस्त्यात कोणी कितीही खुन्नस दिली तरी त्याला प्रत्युत्तर देण्यात वेळ घालवू नका. डोळ्यांसमोर समाजाची वेदना आणि मुलांचे भविष्य ठेवा. कोणत्याही मार्गाने गेलो तरी यंदा जिंकूनच यायचे आहे,” असा एल्गार दिला आहे.
16 सप्टेंबरला पहिला मुक्काम बीडच्या पाटोदा येथे असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा येथे दुसरा मुक्काम असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
20 सप्टेंबरला म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात मराठा मोर्चा मुंबईत पोहोचेल. प्रत्येक मुक्कामापूर्वी आपण दररोज 100 किलोमीटर अंतर पार करु, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Scroll to Top