विक्रमनगर धान्य मार्केट परिसरात कचऱ्याचे साम्राज्य…

दुर्गंधीने नागरिक त्रस्त

कोल्हापूर – शहरातील विक्रमनगर परिसरात प्रस्तावित धान्य गोदाम आणि धान्य बाजारासाठीच्या जागेभोवती संरक्षक भिंती आहेत. मात्र ही जागा सध्या वापरात नाही. त्यामुळे या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग साचून राहिले आहेत. कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे. अनेक दिवस कचऱ्याचे ढीग साचून राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाने या परिसरातील कचऱ्याचा तात्काळ उठाव करावा आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरीकांमधून होत आहे.  

Scroll to Top