आ. रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीचा धक्कादायक मृत्यू…

हत्या की आत्महत्या याबाबत अस्पष्टता

बारामती – आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या 12 वर्षीय मुलीचा बारामतीत धक्कादायक मृत्यू झाला आहे. मुलीची हत्या झाली की आत्महत्या याबाबतचं गूढ कायम आहे. लवकरच याबाबत खरी माहिती समोर येईल असे आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रात्री आईचं आणि मुलीचं किरकोळ भांडण झालं, त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. मुलगी मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. मात्र सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळला आहे. बारामतीतील रुई येथे फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.

Scroll to Top