इतर

नागाळा पार्क कमानीजवळ अतिक्रमण कारवाईचा फार्स, अधिकारी बसून, पोलीस बंदोबस्त अपुरा; महापालिका यंत्रणा निष्क्रिय

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर : कनाननगर परिसरातील नागाळा पार्क कमानीजवळ अतिक्रमण करून घराचे बांधकाम सुरू असल्याच्या कारणावरून कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईदरम्यान अतिक्रमणधारकांच्या समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक वादावादी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अधिकारी बसून, कारवाई मात्र ठप्प…..

अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले; मात्र प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी अधिकारी शांतपणे बसून असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अतिक्रमणधारकांच्या समर्थकांकडून विरोध होत असताना त्याला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेला पोलीस फौजफाटाही अपुरा असल्याचे दिसून आले. त्यामुळे कारवाईला अपेक्षित गती मिळाली नाही.

पोलीस बंदोबस्त अपुरा, महापालिका यंत्रणेचा नियोजनशून्य कारभार…

अतिक्रमण हटविण्यासाठी आलेली यंत्रणा प्रत्यक्ष कारवाईबाबत ठोस भूमिका घेताना दिसत नाही. पोलीस आणि समर्थकांमधील शाब्दिक वादावादी सुरू असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांची निष्क्रियता ठळकपणे जाणवत होती. त्यामुळे अतिक्रमण हटविण्यासाठी आलेली महापालिका यंत्रणा नेमकी कारवाई करणार की केवळ उपस्थिती लावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे अतिक्रमणांवर कठोर कारवाईचे दावे केले जात असताना प्रत्यक्ष घटनास्थळी मात्र अपुरा पोलीस बंदोबस्त, अधिकाऱ्यांची निष्क्रियता आणि नियोजनाचा अभाव दिसून आल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top