इतर

थकीत घरफाळा आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा..!

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर –  थकीत घरफाळा भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि आवश्यक परवाने न घेता व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांवर कोल्हापूर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी रोड परिसरात महापालिकेच्या परवाना विभाग, घरफाळा विभागीय कार्यालय क्रमांक दोन आणि उपद्रव शोध पथकाच्या संयुक्त पथकाने सोमवारी कारवाई केली. यावेळी मणेर आणि वणकुंद्रे यांच्या व्यावसायिक मिळकतींमध्ये विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्यावसायिकांना आवश्यक परवाने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या तर महाराष्ट्र गॅस एजन्सीच्या मिळकतीमधील विनापरवाना गोडाऊन सील करण्यात आले. दुसरीकडे अशोका मिल मिळकतीचे मालक होतवानी यांच्या मिळकतीवरील थकीत घरफाळ्या पोटी महापालिकेने दोन लाख रुपयांची वसुली केली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या निर्देशानुसार उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे आणि करनिर्धारक आणि संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अशोक यादव, उपद्रव शोध पथकाचे अशोक साठे, विनोद रुईकर, भोलानाथ पाटणकर तसेच घरफाळा विभागीय कार्यालय क्रमांक दोनमधील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top