मुक्त सैनिक वसाहतमध्ये घरफोडी...
दोन तोळ्याचे मंगळसूत्र लंपास
कोल्हापूर - मूळचे गगनबावड्यातील रहिवासी असलेले संतोष यमकर हे मुक्त सैनिक वसाहत परिसरातील शुभांगी सावंत यांच्या घरी भाड्याने राहतात. रविवारी सकाळी संतोष यमकर आणि त्यांची पत्नी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होते. यावेळी चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात एका डब्यात ठेवलेले सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले. दुपारी यमकर कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी संतोष यमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.