कोल्हापूर – शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संजीवनी गायकवाड यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
संजीवनी गायकवाड यांनी १९९९ च्या निवडणुकीत शाहूवाडी मतदारसंघातून आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. त्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या संचालिका म्हणूनही कार्यरत होत्या. संजयसिंह गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांनी शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.





