सहकार

मुख्यमंत्र्यांना गोकुळ गुजरातच्या दावणीला बांधायचा असल्यानं पैशाची वारेमाप उधळपट्टी करतायत : राजू शेट्टी

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गोकुळ दुध संघामधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्ती प्रकरणावर उद्या न्यायालयात सुनावणी आहे. यासाठी ८० लाख रूपये खर्च करून वकील मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावर बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी, महाभियोक्ता जर तांत्रिक बाजू मांडण्यासाठी सक्षम नसतील तर त्यांना त्या पदासाठी नियुक्त केलेच का ?, असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला आहे.

राजू शेट्टी यांनी म्हटले आहे कि, “गोकुळच्या निवडणुकी संदर्भात चालू असणाऱ्या केसमध्ये न्यायालयीन कामकाजात राज्याचे महाभियोक्ता हे राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी सक्षम नसल्याने ॲड. मुकुल रोहतगी यांची नियुक्ती केली. महाभियोक्ता जर तांत्रिक बाजू मांडण्यासाठी सक्षम नसतील तर त्यांना त्या पदासाठी नियुक्त केलेच का ?
सरकारकडून तब्बल ८० लाख रूपये फी देवून ॲड. रोहतगी सरकारचे बाजू मांडत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोकुळ दुध संघ गुजरातच्या दावणीला बांधण्याची खुमखुमी असल्याने ते जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी करत आहेत.
राज्यातील जनतेच्या पैशाचा चुराडा करण्यापेक्षा निकाल काय द्यायचा हे आधीच ठरले होते. यामुळे देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे पदवीधर आहेत त्यांनी स्वतः न्यायालयात गुजरातच्या फायद्यासाठी बाजू मांडली असती तर निकाल लागायच तोच लागला असता !
किमान राज्यातील जनतेच्या करातील ८० लाख तरी वाचले असते”

संबंधित विषय

Scroll to Top