सहकार

लोकशाही पद्धतीने आमचाच विजय झालाय, न्यायदेवतेवर आमचा विश्वास : शशिकांत पाटील – चुयेकर

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – आज गोकुळ दुध संघांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी संचालकांनी केलेल्या मतदानामध्ये समविचारी आघाडीच्या शशिकांत पाटील चुयेकर यांना १३ तर महायुतीच्या राजेश पाटील यांना १२ मते मिळाली आणि शासन नियुक्त चार संचालकांची मते महायुतीच्या राजेश पाटील यांना पडली. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड झाली आहे. यावर बोलताना शशिकांत पाटील – चुयेकर यांनी, लोकांचा जनादेश आम्हालाच मिळाला आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने आमचाच विजय झाला आहे. न्यायालयात केस सुरु असल्याने न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. न्याय देवता आम्हाला नक्की न्याय देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top