कोल्हापूर – आज गोकुळ दूध संघाच्या चेअरमन पदाच्या निवडीसाठी दुसरी बैठक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. या बंदोबस्तासाठी खास सांगली, सातारा जिल्ह्याचे पोलीस बोलावण्यात आले असून गोकुळ कार्यालय परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. समविचारी आघाडीचे सर्व संचालक गोकुळ दूध संघामध्ये दाखल झाले आहेत.



