Blog

गोकुळ फसवणुकीविरोधातील लढा छ . शिवाजी महाराजांच्या विचारांच्या बळावर जिंकणार: आ. सतेज पाटील

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

सांगली -“गोकुळ आणि सहकार क्षेत्रात होत असलेल्या फसवणुकीविरोधात आमचा संघर्ष सुरू असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि त्यांच्या विचारांच्या बळावर आम्ही या सर्व संकटांवर नक्कीच मात करू,” असा ठाम विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. सांगली जिल्ह्यातील बावची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

आमदार सतेज पाटील म्हणाले की, कोणत्याही संकटाचा सामना कसा करावा आणि त्याच्यावर मात कशी करावी, याची शिकवण आम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतूनच मिळाली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील अन्यायाविरुद्धचा हा लढा शेवटपर्यंत लढणार असल्याचे त्यांनी त्यांनी म्हटले.


यावेळी आमदार जयंत पाटील, हर्षदा देशमुख-जाधव आणि राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत ,सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, वाळवा पंचायत समितीचे सभापती उदय पाटील, डॉ. सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, वैभव शिंदे, बाळासाहेब पाटील, विजयराव यादव, संग्राम फडतारे, धैर्यशील पाटील, लालासो अनुसे, वैभव रकटे, पेठवडगावचे उपनगराध्यक्ष अभिजीत गायकवाड, डॉ. विकास बामणे, सरपंच कविता अनुसे यांच्यासह सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top