कोल्हापूर – गोकुळच्या अध्यक्ष पदासाठी येत्या १० तारखेला बैठक बोलवण्यात आली आहे तर दुसरीकडे महायुतीच्या सर्व संचालकांना आज पुन्हा एकदा सहलीवर पाठवण्यात आले आहे. मुंबईत नेत्यांची भेट घेऊन ते सर्व अलिबागला पर्यटनासाठी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर बोलताना आ. सतेज पाटील यांनी, आम्ही सर्व कायदेशीर मार्ग अवलंबणार असून गोकुळसाठी रस्त्यावर उतरावं लागलं तर उतरणार, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सरकारने जनतेचा कौल स्वीकारायला हवा. जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेचे बहुमत बाजूला ठेवून निर्णय देऊ नये . २०२९ मध्ये सत्तेचा कौल बदलणार आहे त्यावेळी आम्ही ही गोष्टी लक्षात ठेवू. हा सर्व खेळ खंडोबा नेमका कुणासाठी चालला आहे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.




