ब्रेकिंग न्यूज
अर्थ

अंगणवाडी सेविका अन् मदतनीसांना दिवाळीपूर्वी मिळणार भाऊबीज..!

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई –  राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शासनाने त्यांना प्रत्येकी दोन हजार रूपये भाऊबीज भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० अंगणवाडी मदतनीसांना ही भेट मिळणार आहे. त्यासाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात असल्याची माहिती  महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top