मुंबई – राज्यात सर्वश्रुत असणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या योजनेतील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांची पडताळणी करण्याची सूचना राज्य सरकारने महिला व बाल विकास विभागाला दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ९१ लाख बहीणी अपात्र ठरल्या आहेत. या योजनेत अनुसूचित जाती घटकासाठी ३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अनुसूचित जातींसाठीच्या विशेष घटक कार्यक्रमांतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून पात्र महिला लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थींची संख्या उपलब्ध करून घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. विशेष घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेला निधी केवळ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी महिलांसाठीच खर्च करावा, अशी स्पष्ट सूचना शासनाने केली आहे. त्यामुळे या निधीचा अन्य घटकांसाठी वापर करता येणार नाही. वितरित निधीचा खर्च मंजूर आराखड्यानुसार आणि चालू आर्थिक वर्षातच करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

