ब्रेकिंग न्यूज
अर्थ

यूपीआयवरील एमडीआर शुल्क दिवाळीनंतरच आकारलं जाणार…गाहक -व्यापाऱ्यांना दिलासा

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गेल्या महिन्यात यूपीआय स्टीअरिंग कमिटीने दोन हजारांहून अधिकच्या निवडक पर्सन टू मर्चेंट  ट्रॉन्सॅक्शन्सवर ०. ४ टक्के मर्चेंट डिस्काऊंट रेट अर्थात एमडीआर चार्ज लावण्याचा प्रस्ताव मांडला होता. १५ ऑक्टोबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र या निर्णयाला व्यापारी वर्गातून मोठा विरोध झाला. १५ ऑक्टोबर जवळ येईल तशी बाजारात अनेक मोठ्या व्याहारिक आणि तांत्रिक अडचणी समोर येत होत्या.

 दसरा, दिवाळी आणि छठ सारख्या मोठ्या सणांदरम्यान देशात सर्वाधिक रिटेल व्यवसाय होतो. अशा वेळी अचानक एमडीआर लागू झाल्यास व्यापाऱ्यांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडला असता तसेच सणासुदीच्या काळात खरेदीदरम्यान ग्राहकांच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे एनपीसीआय च्या यूपीआय अॅड सर्व्हिसेस स्टीअरिंग कमिटीच्या बैठकीत मर्चेंट डिस्टकाऊंट रेट अर्थात एमडीआर शुल्क १५ आँक्टोबरऐवजी आता दिवाळीनंतर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आता नवीन डेडलाईन येईपर्यंत यूपीआयव्दारे होणारे सर्व सामान्य मर्चेंट पेमेंट आणि रोजचे व्यवहार पूर्वीप्रमाणेच कोणत्याही अतिरिक्त एमडीआर शुल्काशिवाय सुरू राहतील.

संबंधित विषय

Scroll to Top