गोकुळ दूध संघ बिनविरोधची चर्चा हे महायुतीनं सोडलेलं पिल्लू : आ. सतेज पाटील

उद्या गोकुळसाठी आपलं पॅनल जाहीर करणार : आ. सतेज पाटील

कोल्हापूर – महाविकास आघाडीचे पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आमदार जयंत आसगांवकर यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला आहे. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चेची हवाच काढली आहे.

गोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीमध्ये सुरु असलेला घोळ मिटवण्यासाठी बिनविरोधच्या चर्चेचे पिल्लू सोडण्यात आलंय असे सांगत आमदार सतेज पाटील यांनी उद्या सात ऑक्टोबरला राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाबाबत बोलताना त्यांनी राजकारण वेगळे आणि नातेसंबंध वेगळे असतात असे सांगत डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारी मागचा भाजपचा उद्देश महाराष्ट्राला माहितीय असा टोला लगावला. त्यांनी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. आमदार सतेज पाटील यांच्या स्पष्टोक्तीमुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Scroll to Top