नवी दिल्ली – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी घेतलेले एकतर्फी निर्णय, ‘ECINet’ आणि मतदार यादीतील घोटाळ्याविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.
१९९५ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, निवडणूक आयुक्तांचे निर्णय हे तिन्ही आयुक्तांच्या एकमताने घेतले जाणे आवश्यक आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ कोणताही अंतरिम आदेश देण्यास नकार दिला आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.




