नांदणीकरांनी आ. सतेज पाटील यांचे  मानले आभार…

कोल्हापूर – नांदणीकरांच्या लाडक्या माधुरी हत्तीणीला गुजरातच्या जामनगर येथील  वनतारा प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले होते. तिथून तिला परत आणण्यासाठी राज्य सरकारसह न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागले होते. या सर्व प्रयत्नांसाठी आ. सतेज पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर माधुरी हत्तीण   नांदणीत परतली. ती नांदणीच्या निवासस्थानी आता चांगलीच रमली आहे. या अनुषंगाने आज आ. सतेज पाटील यांनी, नांदणीकरांची भेट घेवून माधुरी हत्तीणीच्या  निवासस्थानाची पाहणी केली. यावेळी नांदणीकरांनी माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल आ. सतेज पाटील यांचे आभार मानले.

Scroll to Top