सीबीएस बसस्थानकातून प्रवाशांचे दागिने आणि रोकड लंपास

कोल्हापूर – चंदगडमधील सुशीला मनोहर जाधव आणि राम कांबळे हे कामानिमित्त शनिवारी कोल्हापूरात आले होते. शनिवारी दुपारी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होती. यावेळी अज्ञातानी गर्दीचा फायदा घेत सुशीला जाधव यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि तीन तोळे वजनाची सोन्याची चेन तसेच राम कांबळे यांच्या खिशातील पंचवीस हजार रुपयांची रोकड असा सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी सुशीला जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Scroll to Top