‘ही माझी शेवटची गोकुळ निवडणूक’ : अरुण डोंगळे यांचे वक्तव्य

कोल्हापूर – गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यासाठी सर्वांकडून अतोनात प्रयत्न केले जात आहेत. यात गोकुळचे दोन वेळा अध्यक्ष राहिलेले अरुण डोंगळे यांनी निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
‘ही माझी शेवटची गोकुळ निवडणूक’ असल्याचे अरुण डोंगळे यांनी म्हटले आहे. तब्बल ३५ वर्षे संचालक म्हणून काम केल्यानंतर आणि दोन वेळा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर यापुढे गोकुळची कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गोकुळच्या निवडणुकीत महायुतीच्यावतीने ते मैदानात उतरणार आहेत हे आता निश्चित झाले आहे.

Scroll to Top