कोल्हापूर – पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचे व्यक्तिमत्व अत्यंत उत्तुंग आहे. अतिशय श्रमाने त्यांनी शैक्षणिक काम उभा केले त्याच बरोबर प्रत्येकाशी आपुलकीने वागत त्यांनी लोकांना प्रेम दिलं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे. महाराष्ट्राच्या ह्दयात त्यांच्या आठवणी कायम राहतील, अशा भावना वन मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.




