जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर – शिक्षक दिन विशेष
कोल्हापूर - शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यंदा एकाचवेळी 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही शैक्षणिक वर्षांतील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी उत्तम अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांचा सन्मान या पुरस्कारांद्वारे करण्यात येतो. प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक आणि त्यासोबत एक विशेष जिल्हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा 2024-25 साठी एकूण 13 शिक्षकांची, तर 2025-26 साठी 15 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
✅2024-25 साठी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक:-
➡️आजरा – अर्चना म्हांगरे
➡️भुदरगड – मारुती देवेकर
➡️चंदगड – कीर्ती पाटील
➡️गडहिंग्लज – वैशाली भोईटे
➡️कागल – छाया चौगुलेराधानगरी – बंडोपंत पाटील
➡️हातकणंगले – राजमोहन पाटील
➡️करवीर – आनंदा पाटील
➡️पन्हाळा – उर्मिला तेली
➡️शाहूवाडी – भानुदास सुतार
➡️शिरोळ – मोहम्मदअसिफ मुजावर
➡️गगनबावडा – बाजीराव जाधव
➡️विशेष जिल्हा पुरस्कार – गणपती कुंभार (कागल तालुका)
✅2025-26 साठी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक:
➡️आजरा – उमाताई लोणारकर
➡️भुदरगड – मारुती डवरी, संजय गुरव
➡️चंदगड – रंजीता देसुरकर
➡️गडहिंग्लज – सतीश तेली
➡️गगनबावडा – क्रांतिसिंह सावंत, मारुती गुरव
➡️कागल – सतीश पाटील
➡️राधानगरी – साताप्पा शेरवाडे
➡️हातकणंगले – संतोष कोळी
➡️करवीर – बाबुराव निकम
➡️पन्हाळा – पल्लवी पाटील
➡️शाहूवाडी – ललिता माने
➡️शिरोळ – अर्पणा परीट
➡️विशेष जिल्हा पुरस्कार – राजाराम रायकर (राधानगरी तालुका)