नवी दिल्ली – नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC-NET जून 2026 परीक्षेतील तीन पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लिश, कॉमर्स आणि समाजशास्त्र या विषयांच्या परीक्षा रद्द करून सप्टेंबरमध्ये पुन्हा घेण्यात येणार आहेत. यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अनेक महिने मेहनत घेतली. त्यांनी अर्ज भरले, परीक्षा शुल्क दिले आणि अनेक जण दूरच्या परीक्षा केंद्रांवर पोहोचले. आता त्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी सप्टेंबरमध्ये तयारी करावी लागणार आहे. चूक NTAची आहे मात्र त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना का मिळत आहे? विद्यार्थ्यांच्या वेळेचे, पैशांचे आणि मानसिक तणावाचेही नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.





