ब्रेकिंग न्यूज
इतर

मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवा – हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर –  उच्च न्यायालयाने मशिदींवरील भोंगे हटवण्याचे आदेश दिले असतानाही अद्याप अनेक मशिदींवर अनधिकृत भोंगे कायम आहेत, असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. भोंग्यांमुळे औद्योगिक वसाहत परिसरातल्या कामगार वर्गाला पुरेशी झोप मिळत नाही. शिवाय विद्यार्थी, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, आणि रुग्ण यांना मशिदींवरील भोंग्यांचा त्रास सहन करावा लागतोय, असा आरोप करत न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान राखत आणि ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमस्वरूपी बंद करावेत, अशी मागणी कोल्हापूरातील हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. आज हिंदु राष्ट्र समन्वय समिती, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, आणि सकल हिंदू समाज यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेत त्यांना मागणीचे निवेदन सादर केले.

 यावेळी उदय भोसले, शिवानंद स्वामी, रामभाऊ मेथे, गजानन तोडकर, कृष्णात पोवार, विक्रम जरग आदी उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top