जालना – मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या मैदानात उतरणारे मनोज जरांगे पाटील यांची डोकेदुखी त्यांच्या सहकाऱ्यांमुळे वाढत चालली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित असणाऱ्या काही सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांवर ईडीकडून चौकशी सुरु झाली आहे.
बीडचे कार्यकर्ते अमोल सुखदेव खुने यांनी तपास यंत्रणांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे सध्या चौकशी सुरु आहे. त्यानुसार मनोज जरांगे यांच्याशी संबंधित चार व्यक्तींची कथित बेनामी मालमत्ता व आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.




