नवी दिल्ली – बाजारात E20(२०% इथेनॉल मिश्रित) पेट्रोल आले असून या पेट्रोलला वाहनधारकांमधून विरोध होत आहे. या अनुषंगाने जुन्या वाहनांचा विचार करून केंद्र सरकार ‘E10 पेट्रोल’ बाजारात आणण्याचा विचार करत आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जुन्या वाहनांचे घटलेले मायलेज आणि इंजिनच्या भागांवर होणारा परिणाम लक्षात घेवून, बाजारात ‘E10 पेट्रोल’ (१०% इथेनॉल मिश्रित) उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र सरकार आणि ऑइल इंडस्ट्रीमध्ये प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसला, तरी कोट्यवधी वाहनधारकांना लवकरच पेट्रोल निवडीचा पर्याय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




