राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना 'मोंथा'चक्रीवादळाचा इशारा...

वेगाने वारे वाहण्याची शक्यता 

<p>राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना 'मोंथा'चक्रीवादळाचा इशारा...</p>

मुंबई – राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना 'मोंथा'चक्रीवादळाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक बोटी किनाऱ्यावर नांगर टाकून उभ्या आहेत.
उत्तर महाराष्ट्र किनाऱ्यावर 45-55 किमी प्रतितास वेगाने आणि 65 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. चक्रीवादळाच्या तीव्रतेनुसार वाऱ्याचा वेग वाढू शकतो. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची तसेच उत्तर कोकणातील सखल भागात पूर येण्याची शक्यता वर्तवली आहे.