राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस; यंदा दिवाळी जाणार पावसातच...

काही दिवसांपूर्वीच देशातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतली. मात्र आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यानुसार आजपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळं यंदाची दिवाळी पावसातच जाणाराय. दरम्यान आज दुपारी कोल्हापूर शहराच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह सुमारे पंधरा मिनिटे झालेल्या जोरदार पावसानं सगळीकडं पाणीच पाणी झालं अचानक पाऊस आल्यानं दिवाळीनिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांसह, व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली.