मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच...अनेक भागात ढगफुटीसदृश स्थिती

<p>मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच...अनेक भागात ढगफुटीसदृश स्थिती</p>

बीड – मराठवाड्यात दोन दिवस थांबलेल्या पावसाने पुन्हा ओतायला सुरु केली आहे. त्यामुळे सावरत असलेल्या मराठवाड्यातील लोकांची मोठी कोंडी झाली आहे. मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूरला पावसाने पुन्हा झोडपायला सुरुवात केली आहे. तसेच हिंगोलीत ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीने धोक्याचा इशारा दिला आहे.