धाराशिव जिल्ह्यातील  परंडा तालुक्यात पावसाचा हाहाकार... 

<p>धाराशिव जिल्ह्यातील  परंडा तालुक्यात पावसाचा हाहाकार... </p>

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना महापूर आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील  परंडा शहरासह तालुक्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच  अनेक रस्ते, पुल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
 
चांदणी व उल्का नदीच्या पुरात काही वस्त्यांवर नागरिक अडकले असून एनडीआरएफच्या वतीने हेलीकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.  अनेक गावात पाणी शिरले असून प्रशासनाच्या वतीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.