बिहारच्या ‘या’ युवा क्रिकेटपटूला देशातील सर्वोच्च बाल सन्मान पुरस्कार... 

<p>बिहारच्या ‘या’ युवा क्रिकेटपटूला देशातील सर्वोच्च बाल सन्मान पुरस्कार... </p>

नवी दिल्ली – आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बिहारचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याला सर्वोच्च बाल सन्मान ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले आहे.
१४ वर्षीय वैभवने आपल्या कामगिरीतून क्रिकेट विश्वात नवे विक्रम रचले आहेत. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकवण्याचा मान त्याने मिळवला आहे. तसेच विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात त्याने 190 धावांचा विक्रमी केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत भारत सरकारने वैभवला राष्ट्रीय पुरस्कार देवून गौरवले आहे.