डीवायपी अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ...

<p>डीवायपी अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ...</p>

कोल्हापूर -  सहा महाविदयालयांचा सहभाग असलेल्या डी. वाय. पाटील शिक्षण संस्था अभिमत विद्यापीठांतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेला आजपासून कदमवाडी येथील मैदानावर सुरूवात झाली आहे.

डी. वाय. पाटील विद्यापीठाचे उपकुलसचिव संजय जाधव यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, अभिजीत पाटील, मधुकर बामणे, प्रा. सागर जानराव, प्रा. रोहन हवालदार, सुशांत कायपुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 या स्पर्धेत डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट  आणि डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी या संघांचा सहभाग आहे. २८ डिसेंबर पर्यत ही स्पर्धा सुरु राहणार आहे.