ईगल क्रिकेट अॅकॅडमीची अश्वमजू स्पोर्टस् वाठारवर एकतर्फी मात...

<p>ईगल क्रिकेट अॅकॅडमीची अश्वमजू स्पोर्टस् वाठारवर एकतर्फी मात...</p>

कोल्हापूर - जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि पाठारे कुटुंबीय पुरस्कृत सोळा वर्षाखालील पाठारे चषक क्रिकेट स्पर्धा कोल्हापूरात सुरु आहे. या स्पर्धेत ईगल क्रिकेट अॅकॅडमी माले आणि अश्वमेध स्पोर्टस् वाठार यांच्यामध्ये साखळी सामना झाला. शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात अश्वमेध स्पोर्टसने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत ईगलने तीनशे शेहेचाळीस ही स्पर्धेतील आजवरची सर्वोच्च धावसंख्या रचली.

यामध्ये ईगलच्या विश्वराज सुतारच्या एकोण नव्वद, शिवराज पाटीलच्या अडुसष्ठ, सुयश लाडच्या बत्तीस, वेदांत पाटीलच्या सव्वीस, हार्दीक बिरंबोळेच्या एकोणीस आणि शंभूराजे खोतच्या अठरा धावांचा समावेश आहे. अश्वमेधकडून गोलंदाज सुजल निकमने दोन, प्रणव चटणे, राज सूर्यवंशी आणि राजवीर पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतले. तीनशे सत्तेचाळीस धावा करण्याचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अश्वमेध स्पोर्टसचा डाव अवघ्या एकशे अठ्ठावन्न धावांवर संपुष्टात आला. त्यांच्या कार्तिक मानेने अठ्ठावीस, प्रणव चटणेने बावीस, सुजल निकमने वीस, राज सूर्यवंशीने एकोणीस, विश्वराज पाटीलने तेरा धावा केल्या. ईगलकडून भेदक गोलंदाजी करताना वेदांत पाटीलने पाच, श्रावण देसाई, विश्वराज सुतार यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. ईगल क्रिकेटने तब्बल एकशे एकोणनव्वद धावांनी सामना जिंकत पाठारे चषक क्रिकेट स्पर्धेत एक वेगळा विक्रम रचला आहे.