आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात

<p>आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात</p>

कोल्हापूर : डी. वाय. पाटील शिक्षण संस्था अभिमत विद्यापीठांतर्गत आंतरमहाविद्यालय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२५ ला कदमवाडी येथील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश खयल्लापा यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेत मुलांच्या सहा तर मुलींच्या पाच संघांचा समावेश आहे. मुलांच्या गटात मेडिकल कॉलेज, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ नर्सिंग, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी या संघांचा सहभाग आहे. तर मुलींच्या गटात मेडिकल कॉलेज, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ नर्सिंग आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट हे संघ सहभागी झाले आहेत.

पहिल्या सामन्यात मुलांच्या स्पर्धेत स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट संघाने स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी संघावर विजय मिळवला. मुलींच्या गटातील पहिल्या सामन्यात डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांनी मेडिकल कॉलेज संघाचा पराभव केला. आज दिवसभर सामने पार पडणार असून विजेत्या संघांना विद्यापीठाच्या गुणगौरव समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील आणि कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. उद्घाटनाला विद्यार्थी विकास संचालक डॉ. अद्वैत राठोड, उपकुलसचिव संजय जाधव, स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, सुशांत कायपुरे तसेच सर्व कॉलेजचे क्रीडा प्रमुख आणि खेळाडू उपस्थित होते.