कोल्हापुरातील ३६ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड...

<p>कोल्हापुरातील ३६ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड...</p>

कोल्हापूर – कोल्हापुरातील ३६ खेळाडूंची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने शाहू शिक्षण प्रसारक मंडळ येथे  शालेय जिल्हास्तरीय विभागीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४७९ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामधूनच ३६ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


यामध्ये डॉ डी वाय पाटील काॅलेजचा समर्थ पाटील, विमला गोयंका स्कूलची ईश्वरी पाटील, सुसंस्कार हायस्कूलचा ओंकार राजू वडर आणि विराज या चौघांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजयी खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.