शाहू छत्रपती केएसए लिग फुटबॉल स्पर्धेचा हंगाम सोमवारपासून सुरू...

<p>शाहू छत्रपती केएसए लिग फुटबॉल स्पर्धेचा हंगाम सोमवारपासून सुरू...</p>

कोल्हापूर : फुटबॉलप्रेमीं प्रतीक्षेत असलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाची सुरुवात सोमवार दि. १ डिसेंबर रोजी होणार आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या (केएसए) आयोजनात शाहू छत्रपती केएसए लिग फुटबॉल स्पर्धेने हंगामास सुरुवात होणार आहे. पहिला सामना संध्यामठ तरुण मंडळ आणि रंकाळा तालीम मंडळ यांच्यात दुपारी १.३० वाजता, तर उद्घाटन सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्टस यांच्यात सायंकाळी चार वाजता होणार आहे. 

केएसएने हंगामातील ५६ सामन्यांचे वेळापत्रक, नियमावली आणि आचारसंहिता जाहीर केली आहे. सिनिअर-८ गटातील सामने दुपारी १.३० वाजता, तर सुपर सिनियर-८ गटातील सामने सायंकाळी ४ वाजता होतील. विजयी संघाला तीन गुण मिळणार आहेत.

गतवर्षीच्या स्पर्धेच्या गुणांनुसार पाटाकडील तालीम मंडळ वरिष्ठ संघांमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर खंडोबा तालीम मंडळ,  श्री शिवाजी तरुण मंडळ, संयुक्त जुना बुधवार पेठ, दिलबहार तालीम मंडळ हे संघ गुणानुक्रमे पाठोपाठ आहेत. केएसएने सर्व संघ, खेळाडू, पदाधिकारी व प्रेक्षकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.