कोल्हापूरच्या कन्येची सुवर्ण कामगिरी...
नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे खाते उघडले...
मुंबई – कोल्हापूरची कन्या रिया पाटीलने 25 व्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये गौरवशाली कामगिरी केली आहे. हैदराबाद येथे पार पडलेल्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने दोन सुवर्ण पदके मिळवली आहेत. रिया ने S-5 ज्युनिअर कॅटेगरीमध्ये 100 मीटर फ्री स्टाईल आणि 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राचे खाते उघडले आहे.
सुरुवातीला तिने 100 मीटर फ्री स्टाईल 3.12 मिनिटात पूर्ण केले. त्यानंतर 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्येही तिने उत्तम कामगिरी करत 1.42 मिनिटाचा विक्रम केला आहे.