सादळे मादळे हायस्कूलच्या अलोक बुचडेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर – करवीर तालुक्यातील सादळे मादळे हायस्कूलच्या अलोक मच्छिद्र बुचडेची लांब उडी क्रीडा स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवन येथे १४ वर्षाखालील वयोगटात विभागीयस्तरीय लांब उडी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अलोक बुचडे याने व्दितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
यासाठी त्याला ज्ञानदिप शिक्षण प्रसारक मंडळ अंबपचे अध्यक्ष विनय तोडकर, संस्था उपाध्यक्ष प्रा.विवेक तोडकर, मंगल तोडकर, शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी घाटगे व क्रीडा शिक्षक विजयकुमार थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. या यशामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.