भारतीय सैन्याकडून नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल पद...

नवी दिल्ली – आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थित भालाफेकपटू नीरज चोप्राला भारतीय सैन्याकडून लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आले आहे.
नीरज चोप्राने अॅथलेटिक्समध्ये केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला हे पद देवून सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे नीरजचा देशाला गौरव मिळवून देणाऱ्या आणि सशस्त्र दलात मानद पद मिळवलेल्या निवडक खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे.