मांडेदुर्ग शिवगर्जना मंडळाच्या दिवाळी कबड्डी स्पर्धेत ऋषीकेश संघ विजेता

चंदगड – युवकांमध्ये क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी दीपावलीनिमित्त शिवगर्जना कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, मांडेदुर्ग (ता. चंदगड) यांच्या वतीने सोमवारी भव्य मॅटवरील ५६ किलो वजनीगट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला खेळाडू आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषीकेश कबड्डी संघा’ने प्रथम क्रमांक, जंगमहटी च्या ‘शिवशक्ती कबड्डी संघा’ने द्वितीय क्रमांक, तर बसूर्ते कबड्डी संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
सोमवारी रात्री पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याला अॅड. संतोष मळवीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पंधरा संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत उत्कट खेळाचे प्रदर्शन केले. तिन्ही विजयी संघांनी उत्कृष्ट समन्वय, कौशल्य आणि जलद प्रतिसाद दाखवत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
स्पर्धेदरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यलुप्पा धामणेकर, उत्तम धामणेकर,उत्तम पाटील, बजरंग धामणेकर, वसंत पाटील, गणपत पवार, शिवाजी पाटील, संभाजी चौथे, डॉ. प्रिया कडगांवकर, संतोष पाटील, श्रद्धा धामणेकर आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच विनायक कांबळे, माजी सरपंच सदानंद पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष भरमाना पाटील, भरत पाटील, कपिल टक्केकर, रानबा कडगावकर, बाळू पवार, किरण पाटील, सूर्याजी पाटील, आदित्य पाटील, कुमार पाटील, सुबराव नावगेकर, मयूर कडगावकर, राम कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.