स्मृती मानधनाने रचला विक्रम ; सर्वाधिक धावा काढणारी जगातील पाचवी आणि भारताची दुसरी फलंदाज ठरली

<p>स्मृती मानधनाने रचला विक्रम ; सर्वाधिक धावा काढणारी जगातील पाचवी आणि भारताची दुसरी फलंदाज ठरली</p>

नवी दिल्ली – महिला विश्वचषकाच्या १३ व्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाज स्मृती मानधनाने नवा विक्रम रचला आहे.  तिने ८० धावांची शानदार खेळी करत ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. असा विक्रम करणारी ती जगातील पाचवी आणि भारताची दुसरी फलंदाज ठरली आहे.  यापूर्वी, माजी कर्णधार मिताली राज हिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ हजारहून अधिक धावा केल्या होत्या. स्मृती मानधनाने या एकाच सामन्यात एकाच वेळी दोन विश्वविक्रम रचले आहेत. मानधना ही सर्वात जलद धावा काढणारी फलंदाज ठरली आहे. तसंच ती सर्वात कमी वयात हा टप्पा गाठणारी खेळाडू ठरली आहे.