जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत भादोलेच्या न्यू अजिंक्यतारा क्रीडा मंडळाचा विजय...खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील न्यू अजिंक्यतारा क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी बीड आणि नाशिक येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे.
बीड येथील १७ वर्षाखालील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मुलांच्या संघात मनीष पोवार(कर्णधार), आर्यन पोळकर, यश माने, समर्थ पडवळ, प्रथमेश पाटील, अथर्व अवघडी आदि खेळाडूंनी सहभाग घेतला तर मुलींच्या संघात तृप्ती रसाळ(कर्णधार), श्रेया संकपाळ, समृद्धी मुंगुरकर, कविता बोडके आदी सहभागी झाल्या होत्या. या मुला- मुलींच्या दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवल्याने त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे पार पडलेल्या १९ वर्षाखालील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत माधवी जाधव (कर्णधार), अक्षता कामते, नंदिनी वड्ड, शर्वरी पाटील आदींनी विजय मिळवला आहे. या यशामुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना दिपराज जामदार, संतोष वड्ड, सागर चव्हाण आणि गणेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.