रमणमळा जलतरण तलावातील जलतरणपटू शालेय राज्य जलतरण स्पर्धेसाठी पात्र

कोल्हापूर - जिम स्विमिंग अकॅडमीचे जलतरणपटू अर्णव प्रवीण भंडारी, आदित्य योगेश पाटील आणि काव्या कपिल मेथे यांनी सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभागीय जलतरण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. १४ वर्षाखालील गटात अर्णव भंडारी याने १०० मी. फ्री स्टाईल रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर आदित्य पाटील याने १०० मी. बटरफ्लाय प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. या दोघांची १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशामागे प्रशिक्षक अजय पाठक यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. तसेच, राज्य व जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने, सचिव ॲड. किरण पाटील, उपमहापौर अर्जुन माने व ॲड. सुशील पाटील यांचे सततचे प्रोत्साहन या यशाला पूरक ठरले.