‘हे वरपासून खालपर्यंत नाटक...’: व्हिडीओ शेअर करत खा. संजय राऊतांचा सुर्यकुमार यादववर संताप... 

<p>‘हे वरपासून खालपर्यंत नाटक...’: व्हिडीओ शेअर करत खा. संजय राऊतांचा सुर्यकुमार यादववर संताप... </p>

मुंबई – काल झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला धूळ चारली. यावेळी कर्णधार सुर्यकुमार यादवने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांच्याकडून विजयाचा चषक स्वीकारण्यास नकार दिला. यावर खा. संजय राऊत यांनी, कर्णधार सुर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ शेअर करून “सगळे वरपासून खालीपर्यंत नाटकं करत” असल्याचे म्हणत संताप व्यक्त केला आहे. 
खासदार संजय राऊत  यांनी, आशिया चषकाची ट्रॉफी जेव्हा पहिल्यांदा समोर आणण्यात आली त्यावेळी आठ संघांचे कर्णधार एकत्र आलेले तेव्हाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावेळी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेल्या नक्वींसोबत सुर्यकुमारने हस्तांदोलन केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. "मालिकेच्या सुरुवातीला, 15 दिवसांपूर्वी त्याने पाकिस्तानी मंत्री मोहसीन नक्वी यांच्याशी हस्तांदोलन केले आणि फोटो काढला. आता हे लोक देशासाठी एक शो करत आहेत! जर तुमच्या रक्तात इतकी देशभक्ती असती तर तुम्ही पाकिस्तानसोबत सामन्यात सामील झाले नसते. हे वरपासून खालपर्यंत नाटक आहे," असं त्यांनी  पोस्ट करत म्हटलं आहे.