महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत उन्नती पटेल व्दितीय

कोल्हापूर – छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात उन्नती पटेलने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेत कोल्हापूरच्या दो अँड मार्शल आर्ट असोसिएशनने उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी श्रीशा पाटील, सृष्टी पाटील चव्हाण, सानिका भजबळे, आलिया शेख, प्रणव बडे आदी विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ चिले, प्रणव खंडागळे, मानव उगारे सर, अशोक शेट्टी ,युवराज पाटील, संदीप शिंदे, संदीप पाटील यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.