आयसीसीने घेतला कठोर निर्णय...

मुंबई – वारंवार होणाऱ्या नियमभंगामुळे आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे क्रिकेटचे सदस्यत्व आयसीसीने तात्काळ रद्द केले असल्याचे निवेदनाव्दारे म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.
आयसीसीने निवेदन जारी करून म्हटले आहे की, अमेरिकन क्रिकेट प्रशासनाने परिषदेच्या संविधानानुसार असलेल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पाळल्या नाहीत. योग्य प्रशासकीय रचना न उभारणे, US Olympic आणि Paralympic Committee सोबत आवश्यक ती प्रगती न करणे आणि देश-विदेशात क्रिकेटची प्रतिमा मलिन करणाऱ्या घटना हे त्यामागचे प्रमुख कारण आहे.
परिषदेने हा निर्णय “खेळाडूंचे आणि क्रिकेटच्या भविष्यातील हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक” असल्याचे सांगितले आहे.