शिवदुर्गा जाधव हिला राष्ट्रीय ISSO ज्युडो स्पर्धेत सुवर्ण पदक

मुंबई – कोल्हापूरच्या शिवदुर्गा विशाल जाधव हिने सातव्या राष्ट्रीय ISSO ज्युडो स्पर्धेत सुवर्ण पदक कमावले आहे.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकरावी कॉमर्समध्ये शिक्षण घेत असलेली शिवदुर्गा हिने 19 वर्षाखालील -63 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकले आहे. या तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे दिल्ली येथे होणाऱ्या SGFI राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शिवदुर्गाच्या या यशामागे शाळेच्या संचालिका प्राचार्या सुस्मिता मोहनती, ज्युनिअर कॉलेज विभागाचे प्राचार्य नितेश नाडे, क्रीडा विभाग प्रमुख विठ्ठल सर, तसेच प्रशिक्षक पैलवान विष्णू पुजारी, बॉबी यादव आणि समथॅ काडगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिला वडील विशाल जाधव, आई तेजल जाधव, आजोबा बाळासाहेब जाधव व आजी कांता जाधव यांचे पाठबळ लाभले.