अरिना मोदी व प्रणव मोरे शासकीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य

<p>अरिना मोदी व प्रणव मोरे शासकीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य</p>

कोल्हापूर : सेंट झेवियर्स हायस्कूल, कोल्हापूर येथे महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय शालेय मनपास्तरीय 17 वर्षाखालील निवड बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण 256 स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये 192 मुलं व 64 मुलींचा समावेश होता. स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळ नियमांनुसार खेळवण्यात आली.

☑️ मुलांचा गट:
➡️अजिंक्य: प्रणव मोरे (एस. एम. लोहिया हायस्कूल) – 7.5 गुण
➡️उपविजेता: मन्वीत कांबळे (वि. स. खांडेकर प्रशाला) – 7 गुण, 41 टायब्रेक
➡️तृतीय: रक्षण पाटील (न्यू स्कूल) – 7 गुण, 38 टायब्रेक
➡️चौथा व पाचवा: राधेश्वर ठोंबरे व संस्कार काटकर (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल) – 7 गुण

☑️मुलींचा गट:
➡️अजिंक्य: अरिना मोदी (पोदारी इंटरनॅशनल स्कूल) – 5.5 गुण, 23 टायब्रेक
➡️उपविजेते: महिमा शिर्के (डी. वाय. पाटील ज्यु. कॉलेज) – 5.5 गुण, 22 टायब्रेक
➡️तृतीय: वेदिका मदने (प्रायव्हेट हायस्कूल) – 5 गुण, 23 टायब्रेक
➡️चौथी व पाचवी: स्नेहल गावडे (प्रायव्हेट इंग्लिश स्कूल) व समिधा साळुंखे (विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल) – 5 गुण

या सर्व गुणवंतांची निवड विभागीय शासकीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे.