एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमीला विवा चॅम्पियनशिप ट्रॉफी

<p>एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमीला विवा चॅम्पियनशिप ट्रॉफी</p>

कोल्हापूर : कोल्हापुरातील उंचगाव येथील विबग्योर हायस्कूल यांच्या वतीने १७ व्या विवा इंटरस्कूल स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेचं प्रतिभानगर, राजारामपुरी येथे आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेत एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विवा चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली.

ही स्पर्धा क्वाड, इनलाइन, रिक्रिएशनल इनलाइन आणि बिगिनर्स अशा स्केटिंग प्रकारांमध्ये, तसेच ६, ८, १०, १२, १४ व १६ वर्षांखालील मुले व मुली अशा विविध वयोगटांत घेण्यात आली. स्पर्धेत प्रतिभानगर, कोल्हापूर येथील एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ३८ पदकांची कमाई केली. त्यामध्ये १७ सुवर्ण, ८ रौप्य व १३ कांस्य पदकांचा समावेश असून या भरीव यशाच्या जोरावर अकॅडमीने विवा चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली.

बिगिनर्स प्रकारात -
अनोखी पाटील (सुवर्ण), आदिती पोळ (रौप्य), अद्विक गावडे व अंकित पोळ (कांस्य) यांनी पदकं मिळवली.

क्वाड प्रकारात-
कवीश शिंदे, तुळजा निंबाळकर, यशवर्धन राऊत, अंजनी पाटील, अफान मौलवी, अवनी जाधव, हिरणमयी सुहास कारेकर, विराज टिपूकडे, निनाद रणदिवे, आयांशू देवकर, भूमीजा भालेकर, साईद जमादार आणि रिवा टमाटी यांनी यश संपादन केले.

इनलाइन प्रकारात-
ध्रुविन ओसवाल, आराध्या शिंदे, अरवीत चोरगे, रेणूश्री मोरे, ओवी पाटील, सचिन खेडेकर, अवनी मंडरूपकर, तन्मय मोरे, नेत्रा अतिग्रे, शिवांश बहिरशेठ, कायरा राणे, आहद शेख, अभिनव भेंडवडे, पर्व साळुंखे, माऊली देसाई, अयांश दोषी, राजलक्ष्मी पाटील, अभीर संकपाळ, अद्विका पाटील, शिवराज रेपे, समर्थ मुळे आणि शौर्य यांनी पदकांची कमाई केली.

यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक सुहास कारेकर व माजी उपमहापौर भूपाल शेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.